Pune News : ‘कवितेस कारण की..’ कार्यक्रमाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज़- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस ( Pune News ) फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘आरपार’ प्रस्तुत ‘कवितेस कारण की..’ हा कार्यक्रम  रविवारदि.30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ‘भारतीय विद्या भवन’ चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,येथे पार पडला.

Today’s Horoscope 02 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

या कार्यक्रमास तरुणाईचा भरभरून प्रतिसाद मिळाला .या कार्यक्रमात जयेश पवार,नैनेश तांबे,भैरवी चितळे,सारंग पांपटवार,अपूर्व राजपूत  यांनी कवितांचे, गझलांचे प्रभावी  सादरीकरण केले. कवितांच्या यासादरीकरणाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय विद्या भवनचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले.

 

हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या ( Pune News ) सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 163 वा कार्यक्रम होता .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.