Today’s Horoscope 02 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 02 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

02.05.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.  आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 19.41 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )

ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)

उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील  विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्याल. छान दिवस.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा )

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. आज मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे.

कर्क (शुभ रंग- मरून.)

प्रॉपर्टी विषयीचे मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आज प्रवासात काही नवीन नाती जुळून येतील. आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत डोके शांत ठेवणे गरजेचे आहे.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांची ही मने जिंकता येतील. नेत्यांची व्यक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील आज आशादायी दिवस.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी )

आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. काही साध्या अशा गोष्टींवरून तुम्हाला आज राग अनावर होईल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपलेच घोडे पुढे दामटवाल.

तूळ ( शुभ रंग- क्रीम)

बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास करावा लागेल दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)

आनंदी व उत्साही असा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराच्या चाव्या मिळतील. तुमची अपुरी स्वप्न साकार होतील.

धनु- (शुभ रंग- जांभळा)

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात दूरच ठेवा.

मकर ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाही. वरिष्ठांना खुश करण्यासाठी नोकरदारांना तारेवरची कसरत करावीच लागणार आहे. आज मनशांतीसाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.

कुंभ (शुभ रंग – केशरी)

आज तुम्ही आपल्या मर्यादेत राहाल तर बरे. धाडसाची कामे आज टाळावीत. सासुरवाडी कडून आज एखादा लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

मीन -(शुभ रंग – आकाशी )

भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.