A R Rahman : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ए. आर. रहमानवर कार्यक्रम मध्येच थांबवण्याची नामुष्की

एमपीसी न्यूज – रात्री 10 नंतर देखील कार्यक्रम सुरूच राहिल्यामुळे पुणे पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि नामवंत संगीतकार ए. आर. रहमान (A R Rahman) यांच्यावर चालू कार्यक्रम थांबवण्याची नामुष्की ओढवली.

पुण्यातील राजा बहादुर मिलच्या मैदानावर रविवारी संध्याकाळी ए आर रहमान (A R Rahman) यांचा लाईव्ह संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी लाऊड स्पीकर वापरण्याची परवानगी रात्री दहा वाजेपर्यंत देण्यात आली होती. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कार्यक्रम रंगल्यामुळे प्रेक्षकांबरोबरच आयोजकांनाही वेळेचे भान राहिले नाही.

रात्री दहा वाजून गेल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने स्टेजवर जाऊन रहमान यांना कार्यक्रम थांबवण्याची सूचना केली. कार्यक्रम मध्येच थांबावा लागल्यामुळे रसिक प्रेक्षकांचा मात्र चांगलाच विरस झाला.

यापूर्वी देखील पुण्यात अनेक मोठे कार्यक्रम पोलिसांनी रात्री दहा नतर थांबवल्याची उदाहरणे आहेत. ए. आर. रहमान (A R Rahman) यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संगीतकाराला देखील तोच नियम लावल्यामुळे पुणे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक होत आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.