Aalandi : इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीच्या साखळी उपोषणास विविध संस्थांचा पाठींबा

एमपीसी न्यूज- आळंदी येथील महाद्वार चौकात  (Aalandi ) इंद्रायणी माता  प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषणास काल (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली.या उपोषणाला संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. या वेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी उपोषण स्थळी सदिच्छा भेट दिली.

 

इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यासाठी देहू संस्थानच्या वतीने नक्की प्रयत्न केले जाईल असे आश्वासन संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि माणिक महाराज मोरे यांनी दिले आहे.तसेच आज

Aalandi : आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्र.1 चे 5 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

 

या उपोषणाला  आळंदी ग्रामस्थ सह ,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,वारकरी संप्रदाय , राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,जनता समर्पित पक्ष,आळंदी जनहित फाउंडेशन यांनी (Aalandi ) जाहीर पाठींबा दिला आहे.तसेच अनेक नागरिकही  नोंदवही मध्ये स्वाक्षरी करून आपला पाठींबा देत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.