Aamir Khan Tested Positive : अभिनेता अमीर खानला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेता अमीर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची तब्येत स्थिर असून, तो सध्या आपल्या घरात क्वारंटाईन आहे.

आमीर खानच्या अधिकृत मीडिया पर्सनलने याबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार ‘आमीर खान यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांची तब्येत स्थिर असून ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

पाणी फाउंडेशनच्या आयोजित कार्यक्रमात सोमवारी (दि. 22) आमीर खान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.