Bhosari Crime News : भोसरीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

एमपीसी न्यूज – भोसरी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. शनिवारी (दि.19) सकाळी साडे आठ ते साडे चारच्या सुमारास ही घटना घडली.

अल्पवयीन मुलीच्या आईने रविवारी याबाबत भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलगी घरातून काहीही न सांगता निघून गेली. अद्याप पर्यंत मुलगी परत न आल्याने तिचे कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.