Maval: प्राणी मित्रामुळे मायलेक बिबट्यांची झाली भेट


एमपीसी न्यूज – मावळ, दारुंब्रे गावाजवळ एक मादी उसाच्या शेतात तिच्या एक महिन्याच्या पिल्लासह विश्रांती घेत होती. अचानक मानवी हस्तक्षेपामुळे तिला तेथूLन पळून जावे लागले आणि तिचे दोन पिल्ले तिथेच राहिले. आई आणि पिल्लांची ताटातूट झाली. शेतक-यांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर प्राणीमित्र अनिल खैरे यांनी वनविभागाच्या मदतीने ताटातूट झालेल्या या बिबट्यांच्या पिल्लांची आईशी भेट घडवून आणली.

पुणे जिल्ह्यातील मावळ क्षेत्रातील दारुंब्रे गावाजवळ उसाच्या शेतात 26 मार्च रोजी बिबट्यांच्या दोन पिल्लांची जोडी सापडली होती. एक मादी उसाच्या शेतात तिच्या एक महिन्याच्या पिल्लासह विश्रांती घेत होती. अचानक मानवी हस्तक्षेपामुळे तिला तेथून पळून जावे लागले. त्यामुळे तिची पिल्ले तिथेच राहिली होती. शेतकर्‍यांनी त्याची माहिती वनविभागाला दिली.

प्राणीमित्र अनिल खैरे यांना याची माहिती मिळाली. ते पुणे येथील सहाय्यक वनसंरक्षक संजय मार्णे, तज्ज्ञ जीवशास्त्रज्ञ, बचाव सदस्य आणि पशुवैद्यकीय सर्जन यांच्यासमवेत त्या ठिकाणी पोहोचले. बिबट्यांच्या पिल्लांची तपासणी केली. दोनही पिल्ले मादी होते. अत्यंत निरोगी होते. त्यानंतर पुण्याच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्या अभिप्रायाने त्यांना त्यांच्या आईबरोबर पुन्हा एकत्रित करण्याचा निर्णय घेतला.

सूर्यास्ताच्या आधी आमचे ऑपरेशन पुर्ण केले. कॅमेरा सापळा लावला आणि त्या परिसरातून आम्ही निघून गेलो. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आई आपल्या पिल्लांना रानात घेऊन गेल्याची माहिती आज सकाळी आम्हाला मिळाली. त्यामुळे ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडविण्यात पुन्हा एकदा यश आल्याचे प्राणीमित्र खैरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.