Nigdi : IICMR आणि I 2IT यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या आयआयसीएमआर (एमसीए) निगडी आणि होप फोंडेशनच्या, इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी (आय2आयटी) पुणे यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार झाला.

बुधवारी (दि. 25) झालेल्या या करारावर आयआयसीएमआर (एमसीए) च्या वतीने संचालिका डॉ. दीपाली सवाई व रिसर्च हेड डॉ. प्रिया देशपांडे यांनी तर इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजिच्या वतीने प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, कॉम्पुटर इंजिनीरिंग विभाग प्रमुख डॉ. शशिकला मिश्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजिचे प्रो . बैईलप्पा भोवी एएसडब्ल्यू, अॅमेझॉन वेब सर्विसेस एज्युकेटर व आयआयसीएमआर निगडीचे सर्व प्राध्यापक उपस्थित होता.

शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन विकास आणि परस्पर आधारावर ज्ञान, सामायिकरणात सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कराराची मदत होणार आहे. आयआयसीएमआर (एमसीए) च्या वतीने संचालिका डॉ. दीपाली सवाई आणि इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजिच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी या कराराचा विद्यार्थी व प्राध्यापक यांना कसा उपयोग होणार आहे याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले. एमसीए विभाग प्रमुख रेणू मॅथ्यु यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.