Mumbai : अजितदादा राजकारणातून संन्यास घेणार नाहीत – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – अजित पवार यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या राजकीय संन्यासाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या प्रकरणावर अजित दादा राजकारणातून संन्यास घेणार नाही, असे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मुंबईत स्पष्ट केले आहे. 

सध्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे. राजकारणापेक्षा शेती किंवा उद्योग कर, असा सल्ला त्यांनी मला दिला आहे. मात्र, ते स्वतः राजकारणातून संन्यास घेणार नाहीत, असे स्पष्टीकरण पार्थ पवार यांनी केले आहे. कुटुंबप्रमुख या नात्याने आपण वडिलांशी झालेल्या संभाषणाची माहिती आजोबांना दिली, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.