Pune : राजकारणाऐवजी शेती, उद्योग करू, अजित पवार यांचा मुलांना सल्ला! शरद पवार यांनीच दिली माहिती

राजकारणाची पातळी घसरल्याने अजित पवार अस्वस्थ

एमपीसी न्यूज – राजकारणाऐवजी शेती किंवा उद्योग करू, असे अजित पवार यांनी मुलांना सांगितलं आहे. तसेच ते मुलांनाही राजकारणापासून दूर ठेवणार आहेत, माझे नाव ईडीने घेतल्याने अजित अस्वस्थ आहे. अजितने राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर माझे त्याच्याशी बोलणे झाले नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, अजित पवार यांनी शेती किंवा उद्योग करू म्हटल्याने उद्विग्न होऊन ते राजकारणातून संन्यास घेण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी रोहित पवार यांचा फोनवर कोणाचा तरी फोन आला, तो लगेच घेत शरद पवार यांना देण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या चेहऱ्यावर कमालीचा तणाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी राजकीय चर्चेला वेगळे स्वरूप आले.

यावेळी शरद पवार म्हणाले, ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे. त्यात माझे नाव टाकण्यात आले. राज्य सहकारी बँकेचा तसेच मी कोणत्याही बँकेचा संचालक नव्हतो. तरीही माझे नाव आल्याने 3 – 4 आठवडेपासून अजित पवार अस्वस्थ झाले होते. विधानसभा निवडणुकीत, ईडीसंबधी काय भूमिका घ्यावी, या विषयी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. गरज पडल्यावर बोलावू, असे ईडीने सांगितले, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा निवडणूक सारे मिळून लढवू. अजित पवार यांचा फोन लागला नाही, अजितला मी स्वतः भेटणार आहे. त्याच्याशी बोलल्यानंतर माध्यमांशी बोलणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

तसेच पवार म्हणाले, आमचं कुटुंब एक आहे. आणि एक राहणार आहे. अजित पवार यांनी मुलाला राजकारण फार वाईट आहे. राजकारणापेक्षा व्यवसाय करू, शेती किंवा उद्योग करू, असे अजित पवार यांनी मुलांना सांगितले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

पवार कुटुंबात कोणताही वाद नाही. कुटुंबप्रमुख म्हणून माझा शब्द अंतिम आहे. माझ्या शब्दाचा सन्मान राखला जाईल, असे पवार म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.