Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित स्नेह मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आज (मंगळवारी) स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 हुन अधिक (Pune News) लोकांच्या उपस्थित संघाचा नेमका उद्देश व ध्येय सांगण्यात आले.

अतुल इनामदार यांनी उद्योजक होण्यासाठी पुढे येणाऱ्या मुलांना सर्व मदत देण्याची इच्छा दर्शवली व गरजू विद्यार्थ्यांना गरजे नुसार आर्थिक मदत ही जाहीर केली. महेश बारसावडे यांनी संघाने केलेली विविध कामांची मांडणी केली.

Talegaon Dabhade : प्रशासनाच्या कामात पत्रकारांचे कार्य मार्गदर्शक – विजयकुमार सरनाईक

सचिन कुलकर्णी यांनी जास्तीत जास्त लोकांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सदसत्व घ्यावे असे आवाहन केले या प्रसंगी गौड ब्राह्मण संघा चे सुभाष शर्मा यांनी ते उभारत असलेले परशुराम मंदिर या बदल माहिती दिली.

महेश कुलकर्णी , दिलीप कुलकर्णी , राजन जी बुडूक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व संघटना मजबूत कशी होईल या वर सर्वांनी भर द्यावा असे नमूद केले. (Pune News) या वेळेस दीपक शर्मा सरचिटणीस अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व पंकज शर्मा सचिव अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या प्रयत्नातून मेडिकेअर मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून 3000 रुपयांचे ह्दय रोग तपासणी चे कुपन मोफत देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.