Bollywood News : अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ होणार ‘या’ तारखेस प्रदर्शित

केला पहिला लूक शेअर

एमपीसी न्यूज : अक्षय कुमारने नुकतीच त्याच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून साजिद नाडियाडवाला यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

ह्याबाबतचे ट्विट करताना अक्षयने त्याचा चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. ‘त्याचा एक लूकच बास आहे! बच्चन पांडे 26 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे’, असे ट्विट त्याने केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद समजी करणार असून चित्रपटात कृती सॅनन, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडीज, पंकज त्रिपाठी यांच्या भूमिका असणार आहेत. चित्रपटाचे शूटींग राजस्थानमध्ये सुरू आहे.

याचबरोबर अक्षय कुमार रोहित शेट्टी दिग्दर्शीत ‘सूर्यवंशी’ आणि आनंद एल. रॉय यांचा ‘अतरंगी रे’ असे चित्रपट करत आहे. यांतील अतरंगी रे हा 2021 मध्येच प्रदर्शित होणार आहे. येत्या 26 जानेवारी 2021 ला अक्षय कुमारने FAU-G गेम लॉंच होणार असल्याचेही यापूर्वी जाहीर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.