Vehicle Theft : देहूरोड, सांगवी, वाकड, भोसरी मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – देहूरोड, सांगवी, वाकड आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी वाहने चोरून नेली आहेत. तर वाकड मधून चोरट्यांनी एक सायकल देखील चोरली आहे. याबाबत शनिवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्यात माधव लक्ष्मण चंदावाड (वय 32, रा. पाटीलनगर, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 24 / क्यू 2707) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि. 23) सकाळी सात वाजता घराच्या पार्किंग मधून चोरून नेली.

श्रीकांत चंद्रकांत जाधव (वय 30, रा धायरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 09 / डी के 7305) ढोरे सब वेच्या पुलावरून चोरून नेली. हा प्रकार 20 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आला.

किरण विष्णू मगरे (वय 21, रा.गुजरनगर, थेरगाव) यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 04 / एफ एस 1812) अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. 22) सकाळी पावणे दहा ते रात्री पावणे अकरा या कालावधीत अटेंडंस कमर्शियल सोसायटी, वाकड येथून चोरून नेली. याबाबत मगरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुलाम हुजूर सय्यद (वय 26, रा. मोहननगर, भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 24 / टी 4595) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

विशाल नगर, पिंपळे निलख येथील सर्वोदय रेसिडेन्सी मधून चोरट्यांनी 5 हजारांची फॅनडॉक कंपनीची सायकल चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 23) सकाळी सात वाजता घडला आहे. याबाबत विजयसिंग विक्रमसिंह जाधव (वय 40, रा. पिंपळे निलख) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.