Akurdi : मुख्यमंत्री शिंदे यांची आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यामुळे (Akurdi) चर्चेला उधाण आले असून शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले बनसोडे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा शहराच्या राजकारणात सुरु झाली आहे.

Thergaon : शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ अभियान सुरू राहील – मुख्यमंत्री

आमदार बनसोडे हे अजित पवार यांचे समर्थक आहेत. त्यांची आमदारकीची 2009 आणि आता 2019 अशी दुसरी टर्म आहे. 2019 मध्ये तर माजी नगरसेविकेला जाहीर झालेली उमेदवारी रद्द करुन बनसोडे यांना दिली होती.

अजित पवार यांनी उमेदवारीत बदल केला होता. त्यामुळे 2019 च्या पहाटेच्या सत्तानाट्यात बनसोडे शेवटपर्यंत अजित पवार यांच्यासोबत होते. आताही आपण दादांचे समर्थक असल्याचे बनसोडे हे जाहीरपणे सांगताना दिसतात.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. अचानक मुख्यमंत्री शिंदे यांनी बनसोडे यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील आमदार बनसोडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मोटारीत एकत्रित प्रवास केला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.