Akurdi : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त प्राधिकरणात पुस्तक प्रदर्शन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने रसिक साहित्य, पुणे आणि प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन दि. 13, 14 आणि 15 जानेवारी 2020 रोजी आयोजित केले आहे.

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड नगनगर विकास प्राधिकरणाच्या प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात मराठी भाषेतील विविध विषयांची पुस्तके विक्रीकरिता उपलब्ध केली जाणार आहेत.

पिंपरी चिंचबड परिसरातील सर्व नागरिकांनी या पुस्तक प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.