Akurdi : खंडोबा यात्रेनिमित्त आकुर्डी मधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची (Akurdi)मंगळवार (दि. 16) आणि बुधवार (दि. 17) रोजी यात्रा भरणार आहे. यात्रेसाठी लाखो भाविक खंडोबा माळ चौकातील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खंडोबा माळ चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत.

Pune : पुण्यात सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड

वाहतुकीत केलेला बदल –

थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक आर. डी. आगा मार्गाकडून(Akurdi ) गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येऊन तेथील टी जंक्शन वरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता डावीकडून परशुराम चौकातून मोहननगर चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.

परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर. डी. आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड टी जंक्शन वरुन उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने टिळक चौक / शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील.

टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्स चौक बाजूकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून या मार्गावरील वाहने सरळ चिंचवड स्टेशन/ दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील.

हा बदल मंगळवारी आणि बुधवारी पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.