PCMC : सेवानिवृत्तांसाठी ‘पीसीएमसी जीवन प्रमाण ऍप’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी हयातीचा दाखला देण्यासाठी ऑनलाईन सिस्टिम या वर्षापासून सुरू करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या 7153 सेवानिवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला देण्यासाठी यापुढे दरवर्षी महापालिकेत येण्याची गरज भासणार नाही. याकरिता महापालिकेने ‘पीसीएमसी जीवन प्रमाण’ या ऍपची निर्मिती केली असून त्यामध्ये सेवानिवृत्तांना एकदाच नोंदणी करावी लागणार आहे

सर्व सेवानिवृत्त निवृत्ती वेतन प्रदान आदेश (पीपीओ) क्रमांकानुसार महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील तळमजला (अभिलेख कक्ष) येथे त्यांचे हयातीचे प्रमाण देण्यासाठी निवृत्त वेतन प्रदान आदेश (पीपीओ ऑर्डर) आणि आधार कार्ड या कागदपत्रांसह समक्ष उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांनी केले आहे.

Pune : पुण्यात सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड

पिंपरी चिंचवड महागनरपालिकेच्या वतीने लेखा विभागात ‘पीसीएमसी जीवन प्रमाण’ ऍपचे अनावरण मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या अनावरण प्रसंगी उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, लेखाधिकारी राजू जठार, सुरेंद्र देशमुखे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल गीता धंगेकर, मुख्य लिपीक (PCMC) राजू गेंगजे, ऍपचे निर्माते आणि एल्टवाईस प्रा. लि. कंपनीचे संचालक निखील निंभोरकर तसेच लेखा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेचे निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाची पडताळणी करणे, त्यांचे निवृत्ती वेतन त्वरित वितरण करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, हयातीचा दाखला ऑनलाईन उपलब्ध करून देणे तसेच सेवानिवृत्तांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे विविध माहिती पुरविणे इ. सुविधा ऍपद्वारे निवृत्ती वेतनधारकांना पुरविण्यात येणार आहेत. ऍपद्वारे जीवन प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीने जमा करता येणार असल्याने सेवानिवृत्तांना हयातीचा दाखला देण्यासाठी यापुढे प्रत्येक वर्षी प्रत्यक्ष कार्यालयास भेट देण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना ऍपद्वारे सुविधा देणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका असल्याची माहिती लेखा विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.