Akurdi Drawing competition News : चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – आकुर्डीचे शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल 740 स्पर्धकांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविला.

वय वर्षे 4 ते 15 वयोगटातील सर्वच स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी 48 बक्षिसे काढण्यात आली.

या वेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक प्रमोद कुटे, युवा नेते झिशान सय्यद, शिवसेना विभाग प्रमुख फारुख शेख, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम चाटे, उपविभाग प्रमुख सचिन निमट, मनोज कुटे, राहुल लोढा, मंदार खैरे, विभाग संघटक रोशन जगताप, संभाजी वालगुडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.