Nigdi News : नृत्यांजली कलाविष्कारस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – निगडी येथील नृत्यकला मंदिर प्रस्तुत आणि नृत्यगुरु तेजश्री अडीगे यांच्या मार्गद्शनाखाली 75 विद्यार्थींनीनी  सादर केलेल्या  “नृत्यांजली” या शास्त्रीय  नृत्य कलाविष्कारास (Nigdi News)  रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निगडी प्राधिकरणातील कै. मनोहर वाढोकर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. लायन्स क्लब ऑफ़ तळेगांवचे अध्यक्ष  वास्तुविशारद मयूर राजगुरू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.  “आलय माझ्या राशीला” या चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकऱ,दिग्दर्शक अजित शिरोळे, अभिनेता प्रणव पिंपळकर, निखिल निगडे, माजी    नगरसेविका  शर्मिला बाबर, मुख्य आयोजक नृत्यकला च्या संचालिका तेजश्री अडीगे आदी उपस्थित होते.

Pimpri News : महापालिकेतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रबोधन पर्व

यावेळी श्लोकम, गणेश कौतुकम, कीर्तनम, अडवू,अल्लारिपू, सरस्वती कौतुकम,जत्तीस्वरम, वरणम, पदम, सरकोजी राजे भोसले रचित अघटित सये, शिवलीला.. तिल्लाना, मंगलम या रचना अत्यांत दिमाखदार पणे  विद्यार्थिनींनी सादर केल्या. आलय माझ्या राशीला च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल (Nigdi News) प्लोमा आणि  पदविका विशारद कोर्स करणाऱ्या विद्यार्थीनींचा  सत्कार करण्यात आला.

प्रथम वर्ष विजेते-   अवनी पाटील,दिव्या कदम – विधी खंडेलवाल,द्वितीय वर्षातील विजेते तनिष्का आचार्य, आराध्य इनामदार,आर्या पाटील  तृतीय वर्षातील विजेते एंजल पटेल, रिद्धी पाटील,दुर्वा म्हणुनकर चौथ्या वर्षीचे  विजेते – अशिता भोंडवे, वैभवी शिंदे, आर्या कुलकर्णी, 5 वे वर्षे विजेते –  कस्तुरी सुतार अंशिता बरगल शर्वी कळसकर ,6 वे वर्ष कलासक्त विद्यार्थी पुरस्कार शर्वरी खात्री हिला प्रदान करण्यात आला.

 

 

तसेच  सनिका सूर्यवंशी, त्रिशा कुंभार, सृष्टी शिवणकर, हरीप्रिया चौधरी, जागृती राणा, महेश्वरी जोशी, गार्गी नवले, यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल गौरवण्यात आले.याबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील विशारद कोर्स 2022  विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनी प्रथम कुमुदिनी पाटील वीणा भोसले, अपूर्वा क्षिरसागर, तन्वी एकदारी, अनुष्का बैरागी  यांना सन्मानित केले.

यावेळी तेजश्री अडिगे म्हणाल्या कि,नृत्य प्रशिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकास घडून येतो. हे शास्त्रीय नृत्य शिकल्यावर कोणत्याही प्रकारच्या अभिनयासाठी विद्यार्थी परिपक्व व  सक्षम होतात.

पिंपळकर म्हणाले कि, नृत्य कला नटराज शंकराकडून आली आहे.  नृत्य हे  देवा पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे.  नृत्य कला हि पवित्र असून यातून ईश्वराची आराधना होते. यामुळे या कलावंत भाग्यवान आहे, असे मत व्यक्त केले. तर .माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी  सर्व विद्यार्थ्यांचे नृत्य नैपुण्य आणि अभिनय (Nigdi News) कौशल्याचे आणि गेली 27 वर्ष सातत्य राखून नृत्यप्रशिक्षण दिल्या बद्दल गुरु चे व नृत्य कला मंदिर चे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाकरिता साथसंगत गायन निथी नायर, मृदंग..  एच व्यंकटरमन, व्हायोलिन अजय चंद्रमौली यांनी केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण गुरू तेजश्री अडिगे यांनी केले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी  तर आभार मनाली कानिटकर यांनी मानले. आयोजन  करिता अनुष्का बैरागी, जान्हवी तायडे प्रशांत  शिंदे, अविनाश अडिगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.