Hinjawadi Crime News : जुनी कार खरेदी करून देतो, असे सांगून 1 लाख 10 हजार रूपयांना गंडा

एमपीसी न्यूज – ह्युंदाई कंपनीची जुनी कार खरेदी करून  देतो, असे सांगून 1 लाख 10 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मे 2019 ते 28 /01/2021 या दरम्यान सुसगाव, मुळशी या ठिकाणी हा प्रकार घडला.

याप्रकरणी तेजपाल शिशूपाल सिंह (वय 61, रा. सुसगाव, मुळशी) यांनी शुक्रवारी (दि.03) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोपाल काशीराम जाधव (रा. सुसगाव) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना जुनी कार घेऊन देतो, असे सांगितले व त्यापोटी त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रूपये घेतले. आरोपीने आजपर्यंत गाडी घेऊन न देता फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंडवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.