Akurdi : आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघ निवडीसाठी शहरातील दोघांची निवड

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघ निवडीसाठी (Akurdi)  पिंपरी चिंचवड येथील अरुण पाडुळे स्पोर्ट प्रमोशन फाउंडेशन मधील दोन नेमबांजी निवड झाली आहे.

नॅशनल रायफल असोसिएशन दिल्ली, आयोजित 66 वी दहा मीटर रायफल व पिस्तूल नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धा भोपाळ येथे सुरू आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातून हजारो नेमबाजांनी सहभाग नोंदवला आहे. पिंपरी-चिंचवड येथील अरुण पाडुळे स्पोर्ट प्रमोशन फाउंडेशन मधील पाच नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

त्यापैकी नेमबाज राजनंदिनी जितेंद्र यादव हिने युथ गटात 600 पैकी 549 व अनुष्का वसंतराव बाबर हिने सीनियर गटात 600 पैकी 554 गुण संपादन केल्याने या उत्कृष्ट अशा कामगिरीमुळे लवकरच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी भारतातून निवडल्या जाणाऱ्या संघ निवडीसाठी या दोन नेमबाजांची निवड झाली आहे. त्यामुळे लवकरच पिंपरी-चिंचवड मधील खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहा मीटर नेमबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

अरुण पाडुळे स्पोर्ट फाउंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातून पिंपरी-चिंचवड मधील मागील 2 वर्षात 10 खेळाडू हे आंतरराष्ट्रीय संघ निवड चाचणी पात्र ठरले असून, 22 राष्ट्रीय खेळाडू बनले आहे.

याच वर्षी अकलूज येथे झालेल्या शालेय झोनल नेमबाजी स्पर्धेत “भक्ती नारायणकर हिला कांस्यपदक” मिळाले असून तिची (Akurdi) निवड शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच युनिव्हर्सिटी स्पर्धेत अनुष्का बाबरला कांस्यपदक मिळाल्याने तिची निवड राष्ट्रीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत झाली आहे.

राष्ट्रीय नेमबाजांचे प्रशिक्षक व प्रशिक्षण केंद्रप्रमुख अरुण पाडुळे स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून त्यांचे पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजी मध्ये पदक मिळवून देण्याचे ध्येय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.