Alandi : एमआयटी वर्ल्ड पीस स्कुलमध्ये एरोमॉडेलिंग शो कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : एमआयटी वर्ल्ड पीस स्कूल आळंदी (Alandi) येथील विद्यार्थ्यांसाठी 7 जानेवारी रोजी एरोमॉडेलिंग शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व विंग कमांडर अजित सप्रे, सोमनाथ परांडे, जितेंद्र जाधव तसेच त्यांच्या अनुभवी  सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन  विद्यार्थ्यांना विमानातील विज्ञान समजून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

विमानाचा शोध कसा लागला? विमान उडते कसे? विमान हवेत तरंगते कसे? त्यामागचे विज्ञान काय? असा प्रश्न लहानांपासून सगळ्याना पडत असतो. प्रत्यक्षात हे पाहता येणे शक्य नसले तरी एमआयटी वर्ल्ड पीस स्कूल आळंदीमध्ये एरोमॉडेलिंग शोच्या माध्यमातून हा शो सर्वांना पाहता आला. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी इतर शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांनी ही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती  नोंदवली होती.

लहान मोठ्या व विविध प्रकरच्या इलेक्ट्रिक मोटार, इंजिनवर उडणाऱ्या व रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणाऱ्या आकर्षक मॉडेल्सची प्रात्यक्षिके व हवाई कसरती या शोमध्ये दाखविण्यात आल्या. चित्तथरारक प्रत्यक्षिकांना पाहत विद्यार्थ्यांसह पालकांनाही जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

Hinjawadi : ब्रँडेड फुट वेअर च्या शोरुम मॅनेजर ने केला सव्वा दोन लाखांचा अपहार

एरोमॉडेलिंग शोच्या प्रात्यक्षिका नंतर उत्साही विद्यार्थी प्रेक्षकांनी (Alandi) आयोजकांना मनोरंजक व कुतूहलाने प्रश्न विचारले. विंग कमांडर अजित सप्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना आनंदित केले.

आनंदाने व उत्साहाने या कार्यक्रमाची सांगता वर्ल्ड पीस स्कुलचे डायरेक्टर ऑपरेशन डॉ.अश्विन कुमार चावर पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रश्मी  सिंग यांनी पाहुण्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे आभार मानून केली. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.