Alandi : समाजकंटकांद्वारे सिद्धबेट येथील संरक्षक भिंतीला पुन्हा भगदाड

एमपीसी न्यूज : आळंदी येथील सिद्धबेट (Alandi)  या ठिकाणी पूर्वी संरक्षक भिंतीला समाजकंटकांनी भगदाडे पाडली आहेत ती बुजवण्यात येणार होती. त्यादृष्टीने सिद्धबेट पर्णकुटी जवळील काही अंतरावरील संरक्षक भिंतीचे एक भगदाड सिमेंट काँक्रीट वीट बांधकामाने बुजवण्यात आले होते. ते भगदाड पुन्हा समाजकंटकानी पडल्याची घटना घडली.

सिद्धबेट येथे सद्यस्थितीत एक बाजू वगळता चालण्याकरिता दगडी ट्रॅक अस्तित्वात आहे. पावसाळ्यात या एका बाजूने दरवर्षी चिखल होऊन चालण्यास नागरिकांना अडचण होते. ही बाब लक्षात घेवून नगरपरिषदेच्या पुढाकारातून आयएएचव्ही (IAHV) या संस्थेने त्यांच्या सीएसआर (CSR ) निधीतून दगडी वॉकिंग ट्रॅकसाठी मदत करण्यास सहमती दर्शवली. व इतर विकास कामे करण्याची सुद्धा सहमती दर्शवली आहे.

त्या विकास कामाचे भूमिपूजन दि.29 मे रोजी करण्यात आले होते. तसेच आयएएचव्ही या संस्थेकडून सद्यस्थितीत तेथील प्रवेशद्वार, संरक्षक भिंती, रंग रंगगोटी व सुशोभीकरणाचे काम चालू असून इतरही विकास कामे नगरपरिषदेच्या पुढाकारातून चालू आहे.

जेथे संरक्षक भिंतींना ठिकठिकाणी मोठी भगदाड समाजकंटकानी पाडली आहेत, तेथे कचरा टाकणे व कचरा पेटवणे, वृक्षतोड करणे, अवेळी येऊन मद्य पिणे असे विविध गैरवापर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच ठीकठिकाणी भगदाडे असल्याने गैरव्यक्ती येऊन गैरप्रकार करू शकतात.

Pune : संजय राऊत यांच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन

येथील क्षेत्र मोठे असल्याने प्रवेशद्वारा जवळील सुरक्षा रक्षक संरक्षक भिंतीला भगदाडे पाडलेल्या ठिकाणी जर गैरप्रकार घडला तर तेथे लवकरात लवकर मदत पोहचू शकत नाही. हे लक्षात घेता व गैरप्रकारांना आळा बसणे व कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी ती भगदाडे बुजवणे गरजेचे होते.

त्या दृष्टीने प्रथमतः तेथील बांधकाम करण्यात आले होते. या पाडलेल्या बांधकामाची संबंधित प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती चौकशी व कारवाई होणे गरजेचे असून असा गैरप्रकार (Alandi) होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे वाटत आहे. या संबंधीत माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

सिद्धबेट संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान व संत मुक्ताई यांची वास्तव भूमी, लीला भूमी, कर्म भूमी आहे. पूर्वीच्या काळात ऋषि मुनींनी येथे तप केले आहे. येथील पवित्र भूमी पवित्र राहावी, कोणतही गैर वापर व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका प्रशासन, विविध संस्था, व्यक्ती यांच्या विविध मार्गातून कार्य चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.