Odisha train accident : ओडिशा रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 260 पार; पंतप्रधानांची घटनास्थळी धाव

एमपीसी न्यूज : काल ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या (Odisha train accident) रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढला असून 261 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वीस वर्षातील भारतातला सर्वात मोठा रेल्वे अपघात शुक्रवारी घडला. तीन ट्रेनची एकमेकांना भीषणतेने टक्कर झाली. ज्यामध्ये आतापर्यंत किमान 261 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासून मृतांच्या संख्येत वाढ झाली असून आणखी मृतांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळी तसेच कटक येथील रुग्णालयात जखमी रुग्णांची भेट घेतली. मोदींनी अपघातस्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक अधिकारी, आपत्ती निवारण दलाचे कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास सांगितले.

Alandi : समाजकंटकांद्वारे सिद्धबेट येथील संरक्षक भिंतीला पुन्हा भगदाड

हा अपघात गेल्या वीस वर्षातला सर्वात मोठा अपघात होता. यामध्ये रेल्वे इतक्या भीषणतेने (Odisha train accident) एकमेकांना आदळल्या की काही डबे तर हवेत उडाले. यामध्ये आतापर्यंत 900 हून अधिक व्यक्ती जखमी आहेत. त्यांना शक्य तेवढी मदत प्रशासनातर्फे केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.