Pune : संजय राऊत यांच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे (Pune) सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत हे काल ऑन कॅमेरा थुंकले होते. त्या कृतीचे राज्यभर पडसाद उमटत असून शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गुडलक चौकात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविला. तसेच यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Pimpri : संजय राऊत यांचे ‘ते’ कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे – श्रीरंग बारणे

यावेळी नाना भानगिरे म्हणाले की, संजय राऊत (Pune) हे सतत बेताल वक्तव्य करीत असून आमच्या नेत्याबद्दल जे कृत्य केले आहे, ते आम्ही कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे संजय राऊतला आता वेड्याच्या इस्पितळात भरती केले जाणार आहे. कोणतेही काम नसलेल्या संजय राऊत यांच डोकं ठिकाणावर नसून माध्यमांनी त्यांना महत्त्व देऊ नका अशी भूमिका मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.