Alandi News : आळंदी मधील पवित्र भागीरथी कुंड परिसर अस्वच्छ

एमपीसी न्यूज  – आळंदी येथील पवित्र भागीरथी कुंडा लगत काही बेशिस्त नागरिकांडून वारंवार शिळे अन्न व इतर कचरा टाकल्याने तेथील परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. (Alandi News) तेथील कचऱ्याच्या दुर्गंधी मुळे त्या रस्त्यावरून रहदारी करत असलेल्या नागरिकांना अक्षरशः नाकाला हाताची मूठ लावून चालावे लागत आहे.या कचऱ्याच्या दुर्गंधी मुळे तेथून रहदारी करणारे नागरिक खूप त्रस्त झाले आहेत.

भागीरथी कुंड पाहण्यासाठी आलेला भटकंती कट्टा ग्रुप मधील पर्यटक सुध्दा तेथील अस्वच्छते मुळे व दुर्गंधी मुळे कुंडा लगत उभे राहू शकत नव्हते व ते कुंड पूर्णपणे पाहू शकले नाहीत.तिथे उघड्यावर कचरा टाकू नये.टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.हा नगरपरिषदेचा फलक लावून सुद्धा तिथे काही बेशिस्त नागरिकांडून कचरा टाकण्यात येत आहे.येथील पवित्र कुंडा लगतचा परिसर अस्वच्छ होणार नाही यासाठी पालिकेने योग्य ती कारवाई केली पाहिजे.अशी मागणी त्यावेळी भटकंती कट्टा ग्रुपने केली होती.

Chinchwad News : नदी प्रदुषण थांबवण्यासाठी जनमताचा दबाव निर्माण करण्याची गरज – उपजिल्हाधिकारी रामदास जगताप

तसेच तेथील भागीरथी कुंडामधील पालिका व इतर संस्थे द्वारे गाळ काढून या वर्षी मे महिन्यात त्या कुंडाची स्वच्छता करण्यात आली होती.त्याचे पुनरुज्जीवन प्रयत्न करण्यात आले. (Alandi News) परंतु सद्यस्थितीत पवित्र अश्या भागीरथी कुंडा मध्ये परत पाला पाचोळा ,प्लास्टिक कागद,प्लास्टिक बॉटल इतर कचरा पडला आहे. व भागीरथी कुंडा मध्ये प्रवेश करण्यास जागा उपलब्ध नाही. भागीरथी कुंड भिंतींनी बंदिस्त असल्याने कुंडा मधील कचरा काढणार कसा?भागीरथी कुंडामध्ये उतरून त्या पवित्र जलाला नागरिक कसा स्पर्श  करणार?हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.