Alandi : चोरी करून जाणा-या चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसात दिले

एमपीसी न्यूज – चोरी करून जाणा-या चोरट्याला परिसरातील नागरिकांनी पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. ही घटना रविवारी (दि. 1) पहाटे तीनच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.

सुरेश गोरख जाधव (वय 29, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी घरमालक सोनुसिंग रूडदासिंग (वय 35, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनुसिंग यांनी चिंबळीमध्ये भाड्याने खोल्या दिल्या आहेत. भाड्याने दिलेल्या एका बंद खोलीचा दरवाजाचा कोयंडा तोडून आरोपी सुरेश याने रविवारी पहाटे खोलीत प्रवेश केला. खोलीतून चार हजार रुपयांची रोकड घेऊन तो पळून जाऊ लागला. त्यावेळी त्या इमारतीमधील अन्य नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि सुरेश याला पकडले. त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले आणि पोलिसांच्या हवाली केले. सुरेश याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.