Alandi : एमआयटी महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवसानिमित्त व्याख्यान व पुस्तकाचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – आळंदी येथील एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ( Alandi ) वाचन प्रेरणा दिवस निमीत्त व्याख्यान व पुस्तकाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 वाचन आणि लेखन यांची आवड असणारे  माजी राष्ट्रपती डॉ. ए .पी.जे. अब्दुल कलाम यांची  जयंती  (15 ऑक्टोबर ) हा दिवस  संपूर्ण  भारतात वाचन प्रेरणा दिवस  साजरा केला  जातो . त्या अनुषंगाने आजच्या विद्यार्थ्यांमध्ये  वाचन करण्याचे  महत्त्व , वाचन संस्कृतिची जोपासना  आणि वाचन हा एक  छंद म्हणून  जर आत्मसात केला तर नक्कीच विद्यार्थी व्यक्तिमत्त्वामध्ये आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होईल. म्हणून  महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व कॉम्पुटर अँप्लिकेशन विभाग  यांच्या समन्वयाने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक  साठी  पुस्तक प्रदर्शनाचे  आयोजित  करण्यात आले.

Pimpri : महापालिकेच्या मुख्य अभियंतापदी श्रीकांत सवणे व रामदास तांबे यांची नियुक्ती

  या प्रदर्शनला 500 पेक्षा अधिक  विद्यार्थ्यांनी भेट दिली.  याच ( Alandi ) दिवशी  “वाचक ते नेता”   या विषयावर  प्राध्यापक संकेत मुणोद  यांचे व्याख्यान  आयोजित करण्यात आले होते .  त्यांनी वाचन आणि मानवी जीवन याचा काय संबंध  आहे हे विशद केले . वाचन हे सामजिक व राजकीय क्षेत्रातील  मधील दुवा आहे.  चांगला समजा  घडवायचा असेल तर वाचन खूप गरजेचे आहे . तसेच समाजात चांगले नेतृत्व  निर्मण करण्यासाठी युवकांनी खूप वाचन केले पाहिजे.  या प्रसंगी त्यांनी महात्मा गांधी यांचे वाचन बदल विचार  या विषयावर  मार्गदर्शन केले.

 संत ज्ञानेश्वर अध्यापक महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.सुरेंद्र हेळकर यांनी स्वागत भाषण  केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . बी .बी .वाफारे यांनी या दिवसाचे महत्व आणि वाचन मानवी जीवन कसे  समृद्ध करते  यावर विचार व्यक्त  केले . कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्राजक्ता बवले  बी .सी  ए ( सायन्स  ) या  विद्यार्थ्यांनी  केले  व वक्त्यांचा परिचय वृषाली पुंडे बी .सी  ए ( सायन्स  ) या  विद्यार्थ्यांनीने  केले.

ग्रंथपाल प्रा .राहुल बाराथे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. मानसी अतिकार , कॉम्पुटर अँप्लिकेशन विभाग प्रमुख डॉ विकास महांडुळे व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोज, डॉ शिल्प  गावंडे (ग्रंथपाल  संत ज्ञानेश्वर अध्यापक महाविद्यालय) , सहायक ग्रंथपाल निलेश मते ,सुनीता साबळे ,सारिका पडवळ आणि सुवर्णा  सानप  यांनी केले.याबाबत माहिती राहूल बाराथे यांनी ( Alandi ) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.