Alandi : महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे-योगी आदित्यनाथ

एमपीसी न्यूज-आळंदी येथे प पू. गोविंददेव गिरी महाराज (Alandi)यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने आज दि.11रोजी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे आळंदी मध्ये आगमन झाले होते.त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.त्यानंतर गीता भक्ती महोत्सवात उपस्थिती लावली.

यावेळी योगी आदित्यनाथ यांना जिरेटोप घालून (Alandi)त्यांचा सन्मान करण्यात आला.गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमा वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना करतो पूज्य स्वामींचे सन्निध्य ,मार्गदर्शन, सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांना दीर्घकाळ लाभो.

 

Nigdi : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीला घातला 24 लाखांचा गंडा

माझे सौभाग्य आहे आळंदी येण्याचे संधी मिळाली.मी नाथ संप्रदयाचा सर्व साधारण अनुयायी आहे.सनातन धर्मानुसार गुरुपरंपरेने पूर्ण समर्पणेने कार्य करतो.आपली परंपरा एक साथ चालते.भगवान ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आहे,त्या परंपरेला प्रणाम करण्या करिता व त्या सेतुला जोडण्याचे ज्यांनी काम केले आहे असे स्वामी गोविंदगिरी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो.

आळंदीत येण्याची मनात खूप दिवसांची इच्छा होती.लहानपणी मी ज्ञानेश्वरी वाचली होती.तेव्हा पासून इच्छा होती अशी दिव्यविभूती कोण आहे. केवळ 15 व्या वर्षी ज्ञानेश्वरी चा उपदेश देऊन भक्तांना नवीन मार्ग दाखवला.ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली.भारताच्या अध्यात्माला पूर्ण भूमंडळावर फडकवण्याचे काम ज्यांनी केले.माझे भाग्य आहे या परंपरेचे दर्शन झाले.

एका परिवरा मध्ये 4 संतांचा उदय झाला.महाराष्ट्र वासी यामुळे सौभाग्य शाली आहे .पूज्य संतांचा आज जो आशीर्वाद प्राप्त होत आहे तो शेकडो वर्षापासून मिळत आहे.
भक्ती पासून मिळणारी ही शक्ती शत्रूचे दात नेहमी आंबट करत होती.समर्थ गुरू रामदास छत्रपती शिवाजी महाराजांना येथून घडवलं.पूर्ण भारतात त्यांनी तेज फडकवले.औरंगजेब च्या सत्तेला आव्हान दिले.

औरंगजेबाला असे मरण्यासाठी सोडले की त्याला आजपर्यंत कोणी विचारत नाही.महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे.

संतांची कृपा येथे वर्षाव करते.येथील भक्तांनी आपल्या पूज्य संतांना एव्हढ्या उंच स्थानी नेऊन ठेवले आहे. त्यामुळे शक्ती सुद्धा सोबत चालत आहे.या शक्तीचा अदभूत संगम छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या रूपाने महाराष्ट्रात आपल्या सगळ्या ना दिसून येते.उत्तर प्रदेशचा जेव्हा मुख्यमंत्री झालो आदरणीय पंतप्रधानानी मला ते दायित्व दिले.

तेव्हा आग्रा मध्ये गेलो होतो.आग्रा मध्ये एक म्युझियम बनत होते.त्याचे नाव होते मोगल म्युझियम,आज दिवसात हे नाव.मी म्हणालो त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवा.आमचा संबंध छत्रपती शी आहे मोगलांशी नाही.

यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नावाने म्युझियम ओळखले जाईल मी म्हटले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती ठेवण्याचे कार्य तिथे आम्ही करत आहोत.पंतप्रधान यांनी उत्तर प्रदेशात डिफेंस कॉरिडोर घोषणा केली.डिफेंस कॉरिडोर ही छत्रपती शिवाजींना समर्पित आहे.

भारताची रक्षा सेना आत्मनिर्भर लक्ष्य प्राप्त होईल त्या दिशेने कार्य होत आहे.यामुळे शक्ती जोडत आहे.आणि पूज्य संतांच्या माध्यमातून भक्ती सुद्धा एकमेकांचे सन्निध प्राप्त करत आहे.याचाच परिणाम आहे शक्ती भक्तीचा अदभूत संगम . 500 वर्षा च्या गुलामगिरी ची गोष्ट ,आता अयोध्येत राम मंदिर पाहण्याचे अलौकिक क्षण आपल्याला प्राप्त होतात.

यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील , आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.