BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : किरकोळ कारणावरून दोन गटात भांडण; परस्परविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन गटात भांडण झाले. ही घटना सोमवारी (दि. 2) वडगाव घेनंद येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी 44 वर्षिय महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाळू सहाधू नितनवरे, छाया बाळू नितनवरे, अभिषेक बाळू नितनवरे, तेजश्री बाळू नितनवरे (सर्व रा. वडगाव घेनंद, बौद्धवस्ती, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू याला पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला बौद्धवस्ती येथे बसली असताना आरोपींना त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटिंग केले. याबाबत महिलेने आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी ‘तु येथे का येतेस’ असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपी बाळू याला अटक केली आहे.

याच्या परस्परविरोधात बाळू हरिभाऊ नितनवरे (वय 57, रा. वडगाव घेनंद, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जया राजू दुधावडे, विनोद राजू दुधावडे, प्रमोद गंगाराम नितनवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

बाळू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाळू बौद्धवस्ती येथे बसले असताना आरोपी जया या महिलेने ‘तू सारखा तक्रार का करतोस?’ असे म्हणून शिवीगाळ केली. तर अन्य आरोपींनी बाळू यांच्या मुलीच्या अंगावर धावून जात तिचा विनयभंग केला. आरोपींनी बाळू आणि त्यांच्या मुलीला दमदाटी व शिवीगाळ केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3