Pune : सृजन करंडक २०१९ बास्केटबॉल स्पर्धेत नेस वाडिया, स.प. महाविद्यालय संघांनी मिळविले विजेतेपद

एमपीसी न्यूज – सृजन करंडक 2019 आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेतील महाविद्यालयीन गटात मुलांच्या विभागात नेस वाडिया, तर मुलींच्या विभागात स.प.महाविद्यालय संघांनी विजेतेपद मिळविले.

मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात नेस वाडिया महाविद्यालयाने इंदिरा कॉलेजचा 49-38 असा पराभव केला. नेस वाडियाच्या विजयात युसूफ सय्यद याने सर्वाधिक 34 गुणांची नोंद केली. त्याला आशिष पवारच्या 11 गुणांची साथ मिळाली. इंदिराय कॉलेजकडून प्रतिक कंगराळकरने 10, तर आशिष जेना याने 9 गुणांची कमाई केली.

बीएमसीसी महाविद्यालयाने एमआयटीचा (डब्ल्यूपीयू) 41-33 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला.

मुलींच्या विभागात स.प.महाविद्यालयाने एमआयटी, लोणी महाविद्यालयाचा 43-29 असा पराभव केला. विजयी संघाकडून सुधित्शा कुलकर्णी हिने 15, तर रुपाली त्रिपाठीने 14 गुणांची कमाई केली. एमआयटीकडून ईशा घारपुरे हिने सर्वार्धिक 13 गुण नोंदविले.

गरवारे महाविद्यालयाने भारतीय विद्यापीठा अभियांत्रिकी कॉलेजचा 34-19 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

निकाल – अंतिम फेरी :
मुले – नेस वाडिया 49 (युसुफ सय्यद 34, आशिष पवार 11) वि.वि. इंदिरा कॉलेज 38 (प्रतिक कंगराळकर 10, आशिष जेना 9) मंध्यतर 31-19
तिसरा क्रमांक – बीएमसीसी 41 (गुरप्रताप थिना 13, शंतनु शिंपी 8) वि.वि. एमआयटी 33 (जोगिंदर संधू 13) मंध्यतर 22-17
मुली – स.प. महाविद्यालय 42 (सुधित्शा कुलकर्णी 15, रुपाली त्रिपाठी 14) वि.वि. एमआयटी, लोणी 29 (ईशा घारपुरे 13) मध्यंतर 25-11
तिसरा क्रमांक – गरवारे कॉलेज 34 (ओशिन अंजनीकर 18, श्वेता शिंदे 11) वि.वि. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी कॉलेज 19 (फौझिया सय्यद 13) मंध्यतर 21-7

एमआयटी लोणी (ऑरेंज) आणि स.प.महाविद्यालय (यलो).

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नेसवाडिया (ग्रे) आणि इंदिरा कॉलेज (ब्ल्यू).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like