Alandi News : केमिकल कंपन्यावर कारवाई होते फक्त कागदावरच- विठ्ठल शिंदे

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतून  तसेच इंद्रायणी (Alandi News) नदी काठच्या गावातून सोडत असलेल्या सांडपाण्यासह कारखान्यातील केमिकल युक्त  मैलमिश्रित पाण्या वर कोणतीही  प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने आज (दि.11एप्रिल) केमिकलयुक्त पाण्याने इंद्रायणी पुन्हा फेसाळलेली दिसून आली.

या इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी एका व्हाट्स ग्रुप वर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले अमृत नद्यांचा अमृत महोत्सव, मात्र आमची एकच नदी आहे की ती  सहा वर्ष  सांगत आहे केमिकल मुळे जलचर जीव मरतात ,  लोकांना त्रास होत आहे.केमिकल कंपन्या वर कारवाई होते फक्त कागदावरच.मात्र कृती शून्य लोकांचं करायचं काय ?

विठ्ठल शिंदे यांच्याशी संपर्क केला असता इंद्रायणी नदी प्रदूषणा बाबत त्यांनी दुसरा व्हिडिओ दिला.त्यामध्ये ते म्हणाले प्रदूषण मंडळ फक्त कागदावर कारवाई करते. नावाला फक्त पेपर देण्या पुरते.मात्र कृती शून्य आहे.कारण कारवाई जर झाली असती तर निश्चितच पुन्हा केमिकल आले नसते.आणि हे बंद होण्याची आणि करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही असे जाणवू लागले आहे.
शासकीय कार्यकर्ते नेमके  काय करतात? कळत नाहीत.  कंपन्यांवर कठोर कारवाई करा.अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच यामध्ये उपोषणाचाही इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच ते  म्हणाले आपल्या परिसरातील आपली नदी स्वच्छ ठेवणे आपलं काम आहे.आपण जर त्यामध्ये केमिकल मिक्स करत असाल तर नदी स्वच्छ राहणार नाही.जलचर जीव मरणार (Alandi News) आहेत. त्याला जबाबदार कोण?

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.