Alandi News : त्या” श्वानास पकडण्यास अखेर यश

एमपीसी न्यूज -आळंदी शहर परिसरात काल  ( दि.1एप्रिल) सायंकाळी सहाच्या (Alandi News)  दरम्यान खंडोबा मंदिर परिसर, शाळा नंबर 4 परिसर येथे एका कुत्र्याने काही नागरिकांना चावा घेतल्याचे वृत्त रात्री 8 वाजता नगरपरिषदेस समजले. त्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख शितल जाधव यांनी तात्काळ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास दूरध्वनीद्वारे कळवून श्वानपथकाची मागणी केली.

 

 

 

Pune News : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा 129 वा स्थापना दिवस साजरा

दरम्यानच्या कालावधीत आरोग्य विभाग कर्माचा-यांमार्फत सदर श्वानाचा शोध घेतला परंतु रात्र जास्त झाल्याने संबंधित कुत्रा आढळून आला नाही. आज (2 एप्रिल ) सकाळी साडे दहा वाजता पिंपरी- चिंचवडच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या श्वानपथकाने आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने संशयित कुत्र्यास पकडून पुढील उपचारासाठी नेले आहे.
आळंदी नगरपरिषदेकडे श्वान पथक वाहन किंवा प्रशिक्षित श्वान पथक उपलब्ध नसल्याने नगरपरिषदेमार्फत बाह्यसंस्थेची नेमणूक करणेकरिता निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता नगरपरिषदेने पुढील काही दिवसाकरिता पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या श्वानपथक यंत्रणेस मदतीकरिता विचारणा केलेली असून पुढील काही दिवसात उपद्रवकारक श्वाना बाबत उपाययोजना केली जाणार असल्याची माहिती  (Alandi News) मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.