Alandi News: दहशतवादी हल्ला प्रसंगीच्या कारवाईची मंदिर परिसरात रंगीत तालीम

एमपीसी न्यूज-दहशतवादी हल्ला प्रसंगी करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने माऊलीं मंदिरात व  तेथील परिसरात आज सायंकाळी(21 जानेवारी ) रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात (Alandi News)आली.

या रंगीत तालीम (मॉक ड्रिल) मध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस स्टेशनचे  आधिकारी ,अंमलदार, नजिकच्या पोलीस स्टेशनचे आधिकारी अंमलदार ,पिंपरी चिंचवड मधील दंगल नियंत्रक, पथक बी डी डी एस,अग्निशमन दल सहभागी होते.

Pimpri News : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 13 जणांना ताब्यात घेत 8  शस्त्रे जप्त

सदर रंगीत तालीम(मॉक ड्रिल) मध्ये  मंदिर परिसरातील गोळाबारी मध्ये 2 दहशतवादी ठार तर 2 जखमी झाल्याचे दाखवण्यात आले.यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे (Alandi News)उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.