Alandi News : प्रक्षाळपूजेनिमित्त माऊली मंदिरात समाधीवर जलाभिषेक करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi News) येथे आज मार्गशीर्ष शु.सप्तमी या दिवशी प्रक्षाळपूजेनिमित्त संत ज्ञानेश्वर संजीवन समाधीवर सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत हजारो भाविकांनी (लिंबू,पिठीसाखर मिश्रित पाण्याने) जलाभिषेक केला. तसेच, या प्रक्षाळपूजेनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरातसुद्धा शिवलिंगावर हजारो भाविकांनी जलाभिषेक केला.

Bhosari News : गर्भपात करत महिलेला व तिच्या मुलांना दिली जिवे मारण्याची धमकी

सकाळी 10:30 ते दु.12 वाजेपर्यंत श्रींचा पवमान अभिषेक, आरती करण्यात (Alandi News) आली. मंदिरामध्ये दुपारी 4 ते 5 दरम्यान वारकरी शिक्षण संस्थेचे प्रवचन, रात्री 10 ते 12 वाजता गावकरी भजन अशा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांना सकाळी 7 ते 11 यावेळेत प्रक्षाळपूजे निमित्त भाविकांनी जलाभिषेक केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.