Alandi: इस्कॉन टेम्पल रावेतचे आळंदी मध्ये संकीर्तन

एमपीसी न्यूज – इस्कॉन टेम्पल रावेत येथून भाविकांचे आळंदी  शहरात (Alandi)आज दि.17 रोजी आगमन झाले .हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे  |हरे राम हरे राम ,राम राम हरे  हरे | च्या संकीर्तना सह त्यांचे सिध्दबेटात आगमन झाले होते .
यावेळी विठ्ठलाचा ,ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत संकीर्तनात,भक्तिरसात त्यांनी  नृत्य करत फुगडी(Alandi) खेळत येथे आनंद लुटला.तसेच यावेळी इस्कॉन टेम्पल रावेत येथून आलेल्या भाविकांना सिध्दबेट महत्व व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र थोडक्यात सांगण्यात आले.

Loksabha Election 2024 :  लोकसभा निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करा – डॉ. सुहास दिवसे

त्यानंतर ते हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे  |हरे राम हरे राम ,राम राम हरे  हरे | च्या संकीर्तनात माऊलीं मंदिराकडे त्यांनी प्रस्थान केले.व आळंदी शहरात ठीक ठिकाणी संकीर्तन करणार असल्याचे त्यांनी सांगतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.