Durga daud : आळंदी मध्ये दुर्गा दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आळंदी येथे श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून घटस्थापनेपासून ते विजय दशमी पर्यंत आळंदी शहरात ठीक ठिकाणी सकाळी दुर्गा दौड फेरी काढण्यात आली. (Durga daud) या दरम्यान हिंदू धर्माची जनजागृती व दुर्गा दौड फेरीतील भगव्या ध्वजाचे जागोजागी पूजन करण्यात आले.

Mahalaxmi Devi : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान

बुधवारी पहाटे 6 वाजल्यापासून दुर्गा दौड फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व लहान-थोर तरुण तरुणी यांचा भक्तिभावाने सहभाग होता.(Durga Daud) गावातील ग्राम देव-देवतांच्या मंदिरात जाऊन दुर्गा मातेची आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या नामाचा जयघोष करत ही फेरी काढण्यात आली. हिंदू धर्माचे जनजागृती करून खरोखरची आजची ही तरुणाई हिंदुधर्माची अस्मिता राखण्याचे काम करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.