Mahalaxmi Devi : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान

एमपीसी न्यूज: पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान केली जाते.(Mahalaxmi Devi)विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्यात आली.

सारसबाग येथील श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर तर्फे वर्षातून दोनदा साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहे. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल 16 किलो वजनाची आहे. (Mahalaxmi Devi) दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.

Chinchwad company fire : चिंचवड येथील कंपनीत भीषण आग 

दक्षिण भारतातील कारागिरांनी 20 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे.(Mahalaxmi Devi) पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत देवीच दर्शन व्हावे आणि त्यानिमित्ताने भक्तांना आशीर्वाद मिळावा, हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात यंदा ‘कमलपुष्प’ सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी विराजमान झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.