Alandi : सिध्दबेट म्हणजे ऊर्जा व प्रेरणा मिळण्याचे स्थान – ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे

एमपीसी न्यूज : आळंदी येथील सिध्दबेटास देहूसंस्थान चे अध्यक्ष ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी एक पाऊल चला सिध्दबेटा कडे अंतर्गत सदिच्छा भेट दिली.यावेळी ते म्हणाले दुरवस्थेत असलेले सिध्दबेटाचा मागील व्हिडिओ पाहिला तेव्हा मन दुःखी झाले होते. (Alandi) परंतु आता चला एक पाऊल सिद्धबेटाकडे या माध्यमातून नव्याने मी येथे भेट दिली.यावेळी येथे नव्याने वृक्षारोपण झालेले आहे. साधक मंडळी येथे ज्ञानेश्वरी चे भागवताचे,तुकाराम गाथेचे वाचन करत आहेत.ही भूमी साधने साठी खरी आहे. ऊर्जा व प्रेरणा मिळण्याचे हे स्थान आहे.पालिकेने सुरक्षारक्षक कर्मचारी येथे नेमल्याने येथे स्वच्छता  आहे. त्यामुळे परिसर सुंदर झाला आहे.याबद्दल मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे त्यांनी आभार मानले.

तसेच ते म्हणाले साधकांना येथे बसल्यावर आनंद प्राप्त होईल.ही जागा अशी आहे की भाविक बहिर्मुख न होता अंतर्मुख होतो. इंद्रायणी प्रदूषण बाबत ते म्हणाले गंगा जशी पवित्र झाली आहे.पंतप्रधानाच्या मार्फत तिथे काम झाले.तसेच काम येथे व्हावे. आपल्या इंद्रायणी नदीचे जल तीर्थ म्हणून भाविक पितात.तीर्थस्थानच अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे येथील हे तीर्थ पवित्र व स्वच्छ व्हावं.

Pune : पुढच सरकार हे शिंदे फडणवीस यांच असणार – उदय सामंत

सिध्दबेट या स्थानाला भेट दिल्यानंतर अतिशय प्रसन्न,आनंददाय वाटले.ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर यांचे वडील यांनी तपश्चर्या केली,संत निवृत्ती, संत ज्ञानदेव, संत सोपान ,संत मुक्ताई यांनी येथे साधना केली.(Alandi) नामस्मरणे केली. यामुळे येथे प्रसन्न वाटले.असे यावेळी ते म्हणाले. यावेळी ह भ प दिलीप आण्णा मोरे ,जनार्दन पाटील,विठ्ठल शिंदे ,जनार्धन पितळे इ.मान्यवर येथे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.