Pune : ….तर मी पहिल्यांदा खासदारकीचा राजीनामा दिला असता – उदय सामंत 

  खासदार संजय राऊतांना टोला 

एमपीसी न्यूज : संजय राऊत साहेबांना 41 आमदारांनी केलेल्या मतदानामुळे खासदारकी मिळाली आहे. मी जर त्यांच्या जागी असतो तर मी पहिल्यांदा खासदारकीचा (Pune) राजीनामा दिला असता आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला असता. अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शेंडी जानव्याचं हिंदुत्व स्वीकारलं नाही. दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही.त्यामुळे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून एकनाथ शिंदे फिरणार आहेत का ? एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे. असा सल्ला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.त्या प्रश्नावर उदय सामंत यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भूमिका मांडली.

Alandi : सिध्दबेट म्हणजे ऊर्जा व प्रेरणा मिळण्याचे स्थान – ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे

यावेळी उदय सामंत म्हणाले की,संजय राऊत यांची दखल केवळ आपण (प्रसार माध्यम) घेता.राज्यातील जनता त्यांची दखल घेत नाही. मी त्यांच्यावर आठ पंधरा दिवसामधून एकदाच भूमिका मांडतो. आम्हाला काम भरपूर असून त्यांना सकाळी साडे नऊ वाजता टीव्ही लावल्यावर तारक मेहता का उलटा चष्मा सारखे असतात.(Pune) त्यामुळे त्यांच्यावर बोलून कशाला त्यांना मोठ करायच, तसेच सकाळी साडे नऊ वाजता होणारी पत्रकार परिषद ही जातीय तेढ निर्माण करणारी असल्याच सांगत संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.