Uddhav Thackeray : भाजपला राज्यातून नामशेष केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज : तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारला दिलं.(Uddhav Thackeray) छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजपला राज्यातून नामशेष केल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी उद्धव ठाकरे म्हंणाले.

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा आज संभाजीनगरमध्ये होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे अनेक दिग्गज नेत्यांच्या हजेरीत ही सभा पार पडली.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो आणि बघीनींनो. गर्दीचा दुष्काळ मला कधीच दिसला नाही. गर्दीचा महापुरच आलेला आहे. 88 साली याच ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) आपल्याला नमस्कार केला होता. आणि शब्द दिला होता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करेल. जे भाजपला जमल नाही ते आपण करून दाखवलं.

Pune : ….तर मी पहिल्यांदा खासदारकीचा राजीनामा दिला असता – उदय सामंत 

याच एका गोष्टीहून त्यांची वृत्ती दिसून आली. यावरुन समजायचं निवडणुका आल्या आहेत. आम्हाला प्रश्न विचारायचे नाही, असं त्यांचं सुरू आहे. हिंदू जन आक्रोश अलीकडे सुरू केले. शिवसेना भवनपर्यंत आणला. जगातला सर्वात मोठा हिंदु नेता असताना आक्रोश करावा लागतो? आमच्या सरकारच्या काळात कुणाला आक्रोश करण्याची गरज नाही. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग काश्मीर मध्ये मोहम्मद मुफ्तीच्या माडिला मांडी लावून बसले होते. मग ते काय होतं? तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व.

अनेक लोक सुशिक्षित आहे. काही लोकांना डॉक्टररेट विकत मिळते. तरीही पदवी दाखवून किंमत मिळत नाही. पाण्याचं इंजेक्शन घेऊन फिरतात. देशाच्या पंत्रधानपदी आपला विद्यार्थी बसला, असा अभिमान शाळेला वाटायला लागतो. असा अभिमान माझ्या पंतप्रधनांबाबत का नाही? कोणी पदवी विचारली तर 25 हजार दंड ठोठावला.

सत्ता गेली तरी आम्ही एकत्र आहोत. अजून घट्ट झालो. मला म्हणता सत्तेसाठी तळवे चाटले. तुम्ही सत्तेसाठी मिंदेंच काय चाटत आहात? तिकडे सत्ता पाडून नितीश कुमारांचे काय चाटत होतात? तुमचा कोणीही सो गोम्या आरोप करेल आम्ही सहन करायचा? मोदीचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान म्हणता. (Uddhav Thackeray) देशातलं सगळ्यात वाईट सरकर समगा आहे, असं म्हणत होता. मग आता तुम्ही समगाच काय चाटत आहात? भ्रष्ट जनता पार्टी असं नाव ठेवा. सगळे भ्रष्टाचारी लोक घेत आहात, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली.

 

राज्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार: अजित पवार 

जेव्हा जेव्हा राज्यावर संकट येतं, त्यावेळी मराठी माणून पेटून उठतो असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. राज्यात महाविकास सरकार असताना ते कोणत्या परिस्थिती अस्तित्वात आलं हे पटवून देण्यासाठी सभा घेणार होतो, पण मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.