Thergaon : थेरगावमधून 25 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज : वाकड पोलिसांनी कैलासनगर, थेरगाव (Thergaon) येथून 25 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.

राहुल सावन मलके (वय 33, रा. तेलंगाना. मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश खेडकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Uddhav Thackeray : भाजपला राज्यातून नामशेष केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात विक्रीसाठी गांजा बाळगला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून (Thergaon) 24 किलो 224 ग्राम गांजा आणि 10 हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.