Pune : पुढच सरकार हे शिंदे फडणवीस यांच असणार – उदय सामंत

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल विधान करीत आहे. त्या विधाना बद्दल आजच्या सभेतून कोणी तरी भूमिका मांडली पाहिजे.त्यामुळे या सभेकडे सर्वांचे डोळे लागले असून सभेला कितीही गर्दी झाली. (Pune) तरी पुढच सरकार हे शिंदे फडणवीस यांच असणार अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडत महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला.

 

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली. त्या प्रश्नावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली.

Pune : येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, सहा कैद्यांवर गुन्हा दाखल

यावेळी उदय सामंत म्हणाले की,एक महिन्यापुर्वी रत्नागिरी येथे सभा झाली.लाखाच्या पुढे लोक सभेला आल्याच सांगण्यात आलं आहे.तीन चार पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन ते गर्दी करीत आहे.(Pune) आपल्याकडील उर्वरित आमदार,कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये.त्याकरिता सभा आयोजित केल्या जात आहे. पण आम्ही त्यानंतर सभा घेऊन उत्तर दिले आहे.मात्र आम्ही आता सभा घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.