Pune : येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, सहा कैद्यांवर गुन्हा दाखल

दोघांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज : पुण्यातल्या येरवडा कारागृहातील (Pune) कैद्यांच्या हाणामारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कैद्यांच्या दोन गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कैद्यांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीमध्ये दोन कैदी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला. या वादानंतर यो दान्ही गटातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. प्लास्टिक बकटे, भाजी वाढण्याच्या वरगळीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. या हाणामारीमध्ये न्यायालयीन कैदी हरीराम गणेश पांचाळ आणि मुसा अबू शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Pune : इमारतीच्या गच्चीवरील मोबाईल टॉवरला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

कैद्यांच्या दोन गटातील हाणामारीची ही घटना 31 मार्च रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडली. येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक 2 च्या जवळील हौदाजवळ ही हाणामारी झाली.(Pune) या प्रकरणी कारागृह शिपायाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी येरवडा पोलिसांनी न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे, रोहन रामोजी शिंदे, साहील लक्ष्मण म्हेत्रे, ऋषिकेश हनुमंत गडकर, ओंकार नारायण गाडेकर, मंगेश शकील सय्यद यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन कैद्यांचे हरीराम पांचाळ आणि मुसा अबू शेख यांच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुनच या कैद्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. (Pune) या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.