Pune : इमारतीच्या गच्चीवरील मोबाईल टॉवरला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

एमपीसी न्यूज : अग्निशमन दल नियंत्रण कक्षात विश्रांतवाडी, कस्तुरबा को ऑप हौसिंग सोसायटी, विजयशांती हाईटस या इमारतीत आज दुपारी 3.30च्या सुमारास आग लागली.(Pune) आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तळमजला+पाच मजली इमारतीत वर गच्चीवर असणारया एका मोबाईल टॉवर व त्याच कंपनीच्या नियंत्रण कक्षात भीषण आग लागली आहे. जवानांनी तातडीने इमारतीमधील सर्व रहिवाशी सुरक्षित असल्याची प्रथम खात्री करुन पाचव्या मजल्यावर गच्चीवर होज पाईप घेऊन जात पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.

Pimpri : भ्रष्टाचारासाठी भाजपकडून असंवेदनशीलतेचा कळस – अजित गव्हाणे

इमारतीमधे जीन्यामधे अडगळीचे सामान व आग गच्चीवर असल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवत धोका दूर केला. आगीचे नेमके कारण समजले नसून आगीमध्ये केबल, मोबाईल टॉवर व नियंत्रण कक्ष पुर्ण जळाले आहे. सदर टॉवर हा रिलायन्स कंपनीचा असल्याचे समजले.

या कामगिरीत धानोरी अग्निशमन केंद्र अधिकारी सोपान पवार व वाहनचालक रघुनाथ भोईर, शंकर गायकवाड तसेच तांडेल भाऊसाहेब चोरमले, अंकुश पालवे व जवान रोहिदास टिंगरे, विठ्ठल आढारी, आकाश राठोड, सुरज निवळकर, अमोल रणदिवे यांनी सहभाग घेतला.

विषेश कामगिरी

अग्निशमन दलाकडील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत वाहनचालक व विश्रांतवाडी येथील रहिवाशी शाहनवाज सय्यद यांचा रोजा सुरू असताना ते हि घटना समजताच अग्निशमन वाहन येण्याआधी वर्दीवर पोहोचले व त्यांनी इमारतीमधील रहिवाशांना इमारतीतून बाहेर पडण्याच्या सुचना देत पाचव्या मजल्यावरील घरातून एक सिलेंडर बाहेर काढून धोका दूर केला व जवानांना आग विझवण्यात मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.