Alandi : कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी राम गावडे यांचा शिवसेनाला जय महाराष्ट्र

एमपीसी न्यूज : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.(Alandi) राम गावडे म्हणाले शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या सोबत ते भाजप मध्ये प्रवेश करणार आहे.

शिवसैनिक पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मी 30 तारखेलाच पक्षप्रमुख यांना पाठवलेला आहे .शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसूनही सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी काहीच दिले गेले नाही.अशी प्रसार माध्यमांना त्यांनी माहिती दिली आहे.

 

Pimpri : भ्रष्टाचारासाठी भाजपकडून असंवेदनशीलतेचा कळस – अजित गव्हाणे

कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. (शिवसेना पक्षाचे) त्यांच्याकडे झालेले दुर्लक्ष.कार्यकर्त्यांची त्यांच्या भागातील विकासासाठी असलेली  प्रामाणिक भूमिका व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते 5 एप्रिल ला भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.(Alandi) यामुळे आळंदी व पंचक्रोशीतील गावातील सर्व राजकिय समीकरणे बदलणार आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.