Alandi : सकल मराठा समाज आळंदी देवाची सर्कल यांचे आज पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू

एमपीसी न्यूज – सकल मराठा समाज आळंदी देवाची (Alandi) व आळंदी सर्कल यांच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज दि.26 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणास महाद्वार चौक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोर सुरवात झाली आहे.

 

श्रीक्षेत्र आळंदी ब्रम्हावृंद अनुष्ठान मंडळ,सिद्धार्थ ग्रुप ,शिवतेज मित्र मंडळ व (Alandi)इंद्रायणी सेवा फाऊंडेशन यांच्या वतीने शांततेच्या मार्गाने चाललेल्या या मराठ्यांच्या या लढ्यास पाठींबा दिला आहे. तसेच मराठा आरक्षणास पाठींबा दिला आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना आता 2025 मध्येच दररोज पाणीपुरवठा?

या मराठा समाजाच्या या लढ्यास सर्व समाजांनी पाठींबा देणे आद्य कर्तव्य आहे.असे सिद्धार्थ ग्रुपने पाठींबा पत्रात म्हटले आहे.

आळंदी येथील चाललेल्या या साखळी उपोषणासपंचक्रोशीतील गावातील अनेक मान्यवरांनी पाठींबा दर्शवत उपोषण स्थळी आज भेटी दिल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.