Alandi Water Supply : थकित बिलाची काही रक्कम भरल्याने सुरू राहणार आळंदीचा पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – आळंदी नगर परिषदेने थकित बिलांपैकी एका बिलाची रक्कम पुणे महापालिकेकडे जमा केल्याने आळंदी शहराला भामा-आसखेड धरणातून होणारा पाणीपुरवठा (Alandi Water Supply) सुरळीत राहणार आहे. 

पाणी बिलाची थकबाकी वाढल्याने पुणे महापालिकेने ऑक्टोबर महिन्यात आळंदीचा पाणीपुरवठा (Alandi Water Supply) बंद करण्याचा इशारा दिला होता. पाण्याच्या पहिले बिलाचा 6 लाख 02 हजार 581 रुपयांचा धनादेश आळंदी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी अक्षय शिरगिरे यांनी नुकताच पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केला.

Indrayani : इंद्रायणी घाटावर मांस शिजवण्याचा संतापजनक प्रकार; वारकरी संप्रदाय संतप्त

दुसऱ्या बिलाची 19 लाख 51 हजार 117 रुपये रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मिळावा, अशी विनंती आळंदी नगरपालिकेने महापालिकेस केली आहे.

पहिल्या बिलाचा धनादेश पुणे महापालिकेत जमा केला आहे. दुसरे बिल भरण्याबाबत महापालिकेकडे अवधी मागितल्याने महापालिकेकडून आळंदीचा पाणीपुरवठा बंद केला जाणार नाही, अशी माहिती अक्षय शिरगिरे यांनी दिली.

सध्या आळंदी शहरात (दि.22) गुरुवार रोजी विद्युत वाहिनीची मेन केबल कट झाल्याने वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता व अद्यापपर्यंत वीज  पुरवठा हा या दोन दिवसांत काही वेळा पुरता मध्येच बंद होत असल्याने आळंदी शहराला पालिका प्रशासनातर्फे पाणीपुरवठा करण्यात समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आळंदी शहराला भामा-आसखेड हा पाणी पुरवठा (Alandi Water Supply) बंद होणार या अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहान शिरगिरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.