Alandi : आज हवेली विभागात तर उद्या खेड विभागात होणार पाणीपुरवठा

भामा आसखेड धरणावरील पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा सुरळीत

एमपीसी न्यूज – काल 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भामा आसखेड धरणावरील पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित (Alandi) झाला होता. एमएसईबी(MSEB) मार्फत तेथे  काम सुरु होते. पुणे शहरासहित आळंदीचा पाणी पुरवठा देखील बंद झाला होता . तेथील काम सुरळीत होऊन रात्री दोनच्या सुमारास आळंदी जलशुद्धीकरणास भामा आसखेडचे  पाणी चालू झाले.

Talegaon Dabhade : कलापिनी आयोजित एकपात्री व नाट्यछटा स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद  

आज( दि.14 )सकाळी 6:00 वाजल्यापासून  हवेली विभागात झोननुसार पाणी वितरण चालू करण्यात आले आहे. (इंद्रायणी नगर वगळता  हवेली भागातील सर्व टप्पे बाकी होते. यामुळे रात्री उशिरा इंद्रायणी नगरचा टप्पा पूर्ण करण्यात येईल.) त्यामुळे खेड (गावठाण) भागात दि.15 रोजी पाणी पुरवठा होईल.  तांत्रिक अडचणीमुळे  दैनंदिन पाणी नियोजनात  बदल करण्यात आला आहे. नगरपरिषदेने अपरिहार्य कारणास्तव  केलेल्या बदलास सहकार्य करावे अशी विनंती नागरिकांस पालिकेने केली (Alandi)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.