Amazon Fraud : मागवले अॅपल व वनप्लसचे महागडे फोन, घरी आले रिकामे बॉक्स

एमपीसी न्यूज – ऍमेझॉनवरून अॅपल व वनप्लससारखे महागडे फोन (Amazon Fraud) मागवणाऱ्या ग्राहकांना मात्र रिकामे बॉक्स मिळाले आहेत. या प्रकरणी पिकींग व पँकींग करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यावर चाकण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 ते 15 एप्रिल दरम्यान आंबेठाण येथे घडला आहे.

सुहेल हरून तांबोळी (रा. सोलापूर शहर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशील उदयसिंहराव गायकवाड (वय 37, रा. बावधन, ता मुळशी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकिंग व पॅकिंग डिपार्टमेंटमधून वस्तूंची पॅकिंग करून ग्राहकांना पाठवले जात असताना पॅकिंगमधून महागडे मोबाईल फोन आणि घड्याळ काढून एका कामगाराने मोकळे बॉक्स ग्राहकांना पाठवले. फिर्यादी हे ऍमेझॉन सेलर सर्व्हिसेस कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीतून ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर (Amazon Fraud) केलेल्या वस्तूंना पॅकिंग करून पुढे डिलिव्हरीसाठी पाठवले जाते.

Crime News : पोलीस असल्याचे सांगत वृद्धाचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

आरोपी हा कंपनीत काम करत होता. त्याने ग्राहकांना जाणा-या पॅकिंग वस्तूंची पॅकिंग खोलून त्यातून दोन अॅपल कंपनीचे आयफोन, एक वन प्लस मोबाईल व एक गोकी स्मार्ट वॉच असा एक लाख 84 हजार 338 रुपयांचा माल काढून ग्राहकांना रिकामे बॉक्स डिलिव्हरीसाठी पाठवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.